A Marathi poem by Praveen Vaidya puts the focus on India’s worst and biggest of all problems – casteism.
CASTE IS NOT CELEAR
The old statue was broken, damaged; it was clear it was desecreted, a protest , all set, was dropped reason: statue’s caste was not clear
The rape shocked everyone, but no help; action there was none no protest, none supported her as her caste was not clear
Exploited, her own life she ended; both for and against many tried politics; but no action was there as her caste was not clear
The book was shocking but none asked if it was true or just fiction, no protest, no slogan we could hear as the author’s caste was not clear
Finally, don’t stop action on caste consideration,. instead, away you cast considering caste
जात कळली नव्हती
चौकातील पुतळा थोडा तुटला होता
जरासा फुटला होता..
झाली होती त्याची विटंबना
मोर्चेकरीही तयार होते..
दंग्यांची मात्र सुरुवात झाली नव्हती
कारण अजूनही पुतळ्याची..
जात कळली नव्हती
बलात्कारी पीडिता किंचाळत होती
अत्याचाराचा न्याय मागत होती..
जनता नेहमी सारखच फक्त बघत होती
मदत करणारच होतो हो आम्ही..
पण अजूनही पीडितेची ..
जात कळली नव्हती
छळलं होत त्याला व्यवस्थेनं
म्हणून त्यानं आत्महत्या केली होती..
ठरतील आता त्याचे समर्थक-विरोधक
सोबत होईल राजकारणही
मग हि शांतता कसली..
कारण अजूनही मरणाऱ्याची ..
जात कळली नव्हती
वाचलेलं पुस्तक अन त्यातला गाभा
कळलेला इतिहास आणि त्यातले संदर्भ
खर मानाव कि खोट
तेच उमगत नव्हतं..
कारण अजूनही लिहिणाऱ्याची ..
जात कळली नव्हती
शेवटी एवढंच..
जात कळत नाही म्हणून
माणसं टाळू नका
जाती अंता साठी..
जातीचा अंत पाहू नका
—-प्रविण वैद्य